शिरूर चा 2029 चा आमदार शिवसेनेचाच होणार - मुख्य प्रवक्ता शिवसेना ज्योती वाघमारे

Dhak Lekhanicha
0

 शिरूर चा 2029 चा आमदार शिवसेनेचाच होणार - मुख्य प्रवक्ता शिवसेना ज्योती वाघमारे


शिरूर (अनिल सोनवणे)-

शिरूर शहरात भव्य पक्ष प्रवेश व मार्गदर्शन मेळावा शिवसेना शिरूर शहराच्या वतीने युवासेना, महिला आघाडी व पदाधिकारी निवड व नियुक्ती पत्र वाटप तसेच शिरूर शहर व शिरूर तालुका भव्य पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

या मेळाव्याचे आयोजन शिवसेना शिरूर शहर प्रमुख मयुर थोरात यांनी केले होते. या मेळाव्यात शिवसेनेच्या मुख्य प्रवक्त्या ज्योती वाघमारे उपस्थित होत्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा मेळावा संपन्न झाला पक्षप्रवेश करणाऱ्या शिवसेने शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना ज्योती वाघमारे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. 

यावेळी मोठ्या प्रमाणात शंभराच्यावर कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश केला.

ज्योती वाघमारे म्हणाले की 2029 चा शिरूर चा आमदार हा शिवसेनेचाच होणार तसेच आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद व नगरपरिषद शिवसेना पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. 

शिरूर शहराच्या विकासासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी 100कोटींचा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणला आहे.

शिरूर शहरात शहर प्रमुख मयुर थोरात व त्यांच्या टीमचे काम उत्तमप्रकारे सुरू असल्याचे त्या पुढे म्हणाल्या.

यावेळी शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गीतांजली ढोणे, शिरूर लोकसभा संपर्क प्रमुख सारिका पवार, उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, उपजिल्हाप्रमुख शरद नवले,तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, शहर प्रमुख मयूर थोरात, शहर संघटक सुरेश गाडेकर, सीमा पवार प्रमोद जोशी संतोष वर्पे,महिला प्रमुख सुजाता पाटील, कविता परदेशी नयना परदेशी, अण्णा हजारे, प्रिया बिरादार,मोनिका राठोड,पूजा काळे,शुभम माळी,भरत जोशी,सागर गव्हाणे,गणेश गिरे,नीता कटके,सुरेखा तोंडे,संजीवनी वाघमारे तसेच मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

अमोल हेमंत लूनिया यांची शिरूर शहर युवा सेना शहराध्यक्ष पदी अमोल हेमंत लूनिया तर महिला अध्यक्षपदी सुजाता पाटील यांची निवड करण्यात आली.

यावेळी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत शहर प्रमुख मयुर थोरात यांनी केले तर प्रसात्विक तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे यांनी केले व आभार शहर संघटक सुरेश गाडेकर यांनी मानले.


वाल्मीक कराडच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले 


संपुर्ण महाराष्ट्र हादरवणारा मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. 

त्या हत्येचा मुळ सूत्रधार हा वाल्मीक कराडच आहे असे मयत संतोष देशमुख यांचे कुदुंबिय सांगत आहेत. या वाल्मीक कराडवर लवकरात लवकर कठोर करवाई कऱण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने कऱण्यात आली. यावेळी वाल्मीक कराडच्या प्रतिमेला जोडे मारून वाल्मीक कराडला फाशी झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. 

Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!